Sunday, June 30, 2024
Homeक्राईमNashik News : बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा! पोलिसांकडून टोळीला रंगेहाथ अटक

Nashik News : बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा! पोलिसांकडून टोळीला रंगेहाथ अटक

प्रिंटरवरुन काढल्या जात होत्या ५००च्या बनावट नोटा

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पोलिसांनी सराफा व्यावसायिकांच्या दुकानांवर छापे टाकले होते. या कारवाईत पोलिसांना मोठं घबाडदेखील सापडलं होतं. ते प्रकरण ज्वलंत असताना नाशिकमधून आणखी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. देशभरात फसवणूक करणाऱ्यांचे फावले असताना बनावट नोटा (Fake Note) बनवणाऱ्या टोळीचेही प्रमाण वाढत चालले आहे. पोलिसांकडून बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत असली तरीही अनेक ठिकाणी बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये ही टोळी बनावट नोटा छापण्याचं काम करीत होती. खऱ्या नोटा स्कॅन करून प्रिंटरवरून त्याच्या प्रिंट काढून बनावट नोटा तयार करण्यात येत होत्या. तसेच या नोटा चलनातही आणल्या जात होत्या. या टोळीकडून पाचशेच्या बनावट तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करताना अंबड पोलिसांनी या टोळीला रंगेहाथ अटक केली आहे.

हॉटेलमध्ये छापल्या पाचशेच्या नोटा

अशोक पगार, हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सिन्नरच्या एका हॉटेलमध्ये प्रिंटरच्या मदतीने पाचशेच्या बनावट नोटा छापल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या आरोपींकडून पाचशे रुपयांच्या ४७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांनी बनावट मोठा छापण्यासाठी वापरण्यात आलेला प्रिंटर आणि लॅपटॉप देखील हस्तगत केला आहे.

दरम्यान, या आरोपींनी पाचशेच्या दोन बनावट नोटा खऱ्या नोटांमध्ये लपवल्या होत्या. त्यांनी त्या एका खाजगी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये चलनात देखील आणल्याची कबुली दिल्याचं अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -