Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Mumbai Weather : उकाड्यापासून मुंबईकरांची होणार सुटका! ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज

Mumbai Weather : उकाड्यापासून मुंबईकरांची होणार सुटका! ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज

'या' राज्यांत उष्णतेचा रेड अलर्ट


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं (Heat) प्रमाण वाढल्याचं दिसून येतं होतं. काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना गारवा मिळत असला तरीही मुंबईकरांना बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे. कालपासून मुंबईतील ढगाळ वातावरणामुळे लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता अशातच पुढील आणखी काही हा दिलासा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Weather Update)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरांमध्ये पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा (Rain) अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना अलीकडच्या आठवड्यात उच्च तापमानापासून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत १०-११ जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.



या भागात उष्णतेचा रेड अलर्ट


देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होताना अशातच देशातील १७ ठिकाणी तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे दिल्ली व्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.


दरम्यान, यंदा वेळेच्या आधीच मान्सून (Monsoon) अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय तो वेगाने पुढे सरकत असून लवकरच नागरिकांना मान्सूनचा आनंद घेता येणार आहे.

Comments
Add Comment