Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Konkan Railway : चाकरमान्यांचा खोळंबा! कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार

Konkan Railway : चाकरमान्यांचा खोळंबा! कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार

'या' दिवशी असणार मेगाब्लॉक


मुंबई : उन्हाळी सुट्ट्या (Summer Vacation) संपत आल्यामुळे गावी गेलेले अनेक चाकरमानी आता परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. अशातच कोकणातून (Kokan) परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पायाभूत कामांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक (Kokan Railway Megablock) जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून सीएसएमटी (CSMT) येथे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या अवेळी धावत आहेत. त्याचबरोबर कोकण रेल्वेवर देखील रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



असं असेल रेल्वेचं वेळापत्रक


कोकण रेल्वेवरील रत्नागिरी- वैभववाडी रोड दरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी, ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यावेळी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते वैभववाडी रोडदरम्यान ८० मिनिटे थांबा घेईल. तसेच गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान ४० मिनिटे थांबा घेईल. तर गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीदरम्यान २० मिनिटांचा थांबा घेईल.

Comments
Add Comment