Friday, July 11, 2025

तुमचा मोबाईल स्लो चार्ज होत आहे का? उन्हाळा तर नाहीये ना कारण...

तुमचा मोबाईल स्लो चार्ज होत आहे का? उन्हाळा तर नाहीये ना कारण...

मुंबई: तुमचा मोबाईल फोनही स्लो चार्ज होत आहे का? उन्हाळ्यात अनेकदा ही समस्या येते. दरम्यान, सर्व लोकांना याबाबत माहिती नसते. दरम्यान, यावेळेस भारतात मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवत आहे. अनेक लोकांच्या मोबाईल फओनची चार्जिंग स्पीड कमी झाली आहे. काही फोनचा चार्जिंग स्पीड तर खूपच कमी झाला आहे.


एक स्मार्टफोन तेव्हाच चांगले काम करत असतो जेव्हा त्याच्या जवळपासचे तापमान सामान्य असते. जसे तापमान वाढू अथवा कमी होऊ लागते तसा फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. असेच काहीसे उन्हाळ्यात होते. बाहेरचे तापमान जेव्हा अधिक असते तेव्हा फोनवर ब्राउजिंग, कॅमेऱ्याचा वापर आणि गेम खेळल्यास हीट बाहेर निघते. यामुळे फोन खूप गरम होतो.


नवे फोन अधिक ब्राईट डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसरसोबत येतात यामुळे लवकर गरम होतात. फोन गरम होताच सिस्टीम याला कूल करायला लातो. अशातच परफॉर्मन्स कमी होतो.


अशातच काही फोन चार्ज होत नाही. नव्या फोन्समध्ये असे काही फीचर्स आहेत ज्यांच्यामुळे हीट रिलीज होते. अशातच फोनमध्ये लावलेले सेन्सॉर चार्जिंग स्लो करतात. अथवा बंद करतात. यामुळे फोन थंड होईल. जसे फोन नॉर्मल होतो. तसेच चार्जिंग आधीप्रमाणे काम करायला लागते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा