Thursday, May 8, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

IPL संपली, टीम इंडियाचा टी-२० वर्ल्डकपचा संपूर्ण कार्यक्रम

IPL संपली, टीम इंडियाचा टी-२० वर्ल्डकपचा संपूर्ण कार्यक्रम

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४चे समापन कोलकाता नाईट रायडर्सचा विजयासह झाले आहे. कोलकाताने फायनलमध्ये हैदराबाद संघाला हरवत तिसऱ्यांदा ट्रॉफी मिळवली.


भारतीय संघातील अधिकतर खेळाडू टी-२० वर्ल्डकपसाठी रवाना झाले आहेत. भारताला ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड आणि अमेरिकेसोबत ठेवण्यात आले आहे.


भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध ५ जूनला खेळवला जाणार आहे. ९ जूनला भारतीय संघ पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढणार आहे. भारताला १२ जूनला अमेरिकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. १५ जूनला टीम इंडिया कॅनडाविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळेल. भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

Comments
Add Comment