मुंबई : मुंबईतील धारावी (Dharavi) येथे पहाटेच्या सुमारास एका गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत ६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील अशोक मिल कंपाउंड रोडवरील कला किला येथे ही आगीची घटना घडली आहे. या परिसरातील कमर्शियल गारमेंट, जिमला पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. ही आग जमिनीपासून गोदामाच्या वरील तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेत इमारतीमधील लाकडी साहित्य आणि फर्निचर जळाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच दहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाकडून सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना आगीतून बाहेर काढून उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलं आहेत. दरम्यान, सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे. मात्र आग लागण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसल्याचं अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सावंत यांनी सांगितले.
आगीत जखमी झालेले सलमान खान (२६) अणि मनोज (२६) ८ ते १० टक्के भाजले आहेत. सैदुल रहमान (२६) हे ३५ ते ४० टक्के भाजले आहेत. तर रफिक अहमद (२६), सल्लाउद्दीन(४०) व सैदुल रहमान (२६) हे ४० ते ५० टक्के भाजले आहेत. दरम्यान, जखमींवर उपचार सुरु असून सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…