भाजपा नेते निलेश राणे यांचा इशारा
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) भाजपाने ‘४०० पार’चा नारा दिला. मात्र, यामुळे एनडीएला नुकसान पोहोचल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. एनडीए ४०० पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही, ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकीनऊ आले, असं भुजबळ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते नाराज झाले आहे. युतीत असताना मित्रपक्षाविषयी भुजबळांनी केलेस्या वक्तव्याबाबत भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कठोर भूमिका घेत छगन भुजबळ यांना अशी वक्तव्ये न करण्याचा इशारा दिला आहे.
निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करुन म्हटले आहे की, श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे,
मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं???
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही.… pic.twitter.com/URRnsPQAhe— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) May 28, 2024