Tuesday, June 17, 2025

टेकऑफच्या आधी इंडिगो फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्लीवरून वाराणसीला जात होते विमान

टेकऑफच्या आधी इंडिगो फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्लीवरून वाराणसीला जात होते विमान

मुंबई: दिल्लीवरून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर लगेचच विमानाला रनवेवर रोखण्यात आले. तसेच तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.


विमान सकाळी ५.०४ मिनिटांनी दिल्लीच्या टी२ टर्मिनल येथून वाराणसीसाठी टेकऑफ करणार होते मात्र बॉम्बची सूचना मिळताच प्रवाशांना बाहेर काढून फ्लाईटला तपासासाठी दिल्लीच्या एअऱपोर्टच्या आयसोलेशनसाठी नेण्यात आले. यावेळी बॉम्ब स्क्वॉड टीम आणि सीआयएसएफ टीमला बोलावण्यात आले. यानंतर फ्लाईटची तपासणी करण्यात आली.



इंडिगो फ्लाईटमधून लोक आले बाहेर


इंडिगो फ्लाईटमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रवासी इमरजन्सी गेटमधून निघत आहे. प्रवाशांना विमानातून लवकरात लवकर बाहेर काढले जात आहे. यात प्रवासी घाईघाईत खिडकीतूनही बाहेर निघत आहे.


 


टिशू पेपरवर लिहिले होते बॉम्ब


मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो फ्लाईट लॅब्रोटॉरीमध्ये एका टिश्यू पेपरवर बॉम्ब लिहिलेले आढळले होते.यानंतर एकच कल्लोळ झाला.

Comments
Add Comment