मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ अतिशय जवळ आला आहे. स्पर्धेची सुरुवात होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. याआधी २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये बाहेर पडावे लागले होते. अशातच पाच खेळाडू असे आहेत जे यावेळेस टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देऊ शकतात.
विराट कोहली
जूनपासून खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये २०२४मध्ये विराट कोहली भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. याआधी २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. रोहित शर्मा सलामीवीराची भूमिका अतिशय चोख निभावतो. २०२३मध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा चांगली सुरूवात करतात.
जसप्रीत बुमराह
बुमराह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल. शानदार बॉलिंगमुळे तो टीम इंडियाला खिताब जिंकून देऊ शकतो.
सूर्यकुमार यादव
टी-२० आंतरराष्ट्रीयमधील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव काही बॉलमध्येच गेम बदलण्याची ताकद ठेवतो. सूर्या जर चांगला फॉर्म दाखवत असेल तर टीम इंडियाला मोठा फायदा पोहोचू शकतो. २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सूर्याने २३९ धावा केल्या होत्या.
कुलदीप यादव
कुलदीप यादवची फिरकी टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. कुलदीप मुख्य स्पिनर म्हणून खेळणार. कुलदीपचा चांगला फॉर्म टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यात फायदेशीर ठरू शकतो.