Thursday, May 8, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: टरबूज-कलिंगड खाण्याआधी जरूर करा हे काम

Health: टरबूज-कलिंगड खाण्याआधी जरूर करा हे काम

मुंबई: देशभरात सध्या भीषण उन्हाळा सुरू आहे. सगळीकडेच पारा ४५ डिग्रीच्या वर पोहोचला आहे. सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गर्मी सुरू आहे. अशातच उन्हाळ्याच्या स्थितीत हायड्रेट राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी टरबूज आणि कलिंगडाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.


याच अशी चर्चा आहे की या गरमीच्या दिवसांत लोक टरबूज तसेच कलिंगडाच्या सेवनाने फूड पॉईझनिंगचे बळी ठरत आहेत. तज्ञांच्या मते फळांचा रंग आणि स्वाद वाढवण्यासाठी डाय अथवा शुगर सिरपचा वापर केला जातो.


यातील केमिकल्स आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरतात. याशिवाय ही फळे ज्या मातीतून उगवतात तेथील हानिकारक बॅक्टेरिया फळांमध्ये येतात. तज्ञांच्या मते टरबूज आणि कलिंगड स्वच्छ धुतले पाहिजे. त्यानंतर वरील साल स्क्रब करा.


त्यानंतर ३ कप पाण्यात थोडेसे व्हिनेगार मिसळा. त्यानंतर टरबूज आणि कलिंगड धुवा. यामुळे यावरील बॅक्टेरिया संपून जातील.

Comments
Add Comment