
जाणून घ्या आजचे दर
नवी दिल्ली : सोनं चांदी खरेदीदारांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर, सोन्याची किंमत काहीशी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये दरवाढीचे सत्र सुरू असल्याचे दिसून येते. आज सकाळपासून सकाळपासून सोन्याच्या दरात वाढ नोंदवली जात असताना चांदीने कहर केला आहे. चांदीने सोन्याचे दर गाठले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला आता चांगलाच फटका बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मौल्यवान धातूंवर तेजीचा रंग चढला आहे. आज बाजाराच्या सुरुवातीला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव २४० रुपयांनी वाढून ७१,४९६ रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, सोन्यासह चांदीचा दर १,३५२ रुपयांच्या वाढीसह ९१,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
जाणून घ्या सोनं-चांदीचे आजचे दर
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव शहरात आज २४ कॅरेट सोन्याचे दर ७२,७१० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचे दर ६६,६५० रुपये आहेत. तर चांदीचे आजचे दर ९३,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, सोने आणि चांदीच्या दरवाढीमुळे ग्राहकांना आगामी काळात खरेदीवर अधिक खर्च करावा लागणार असं चित्र दिसत आहे.