Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीDhadak 2 : एक होता राजा...एक होती राणी...त्यांची जात वेगळी.. अन्...

Dhadak 2 : एक होता राजा…एक होती राणी…त्यांची जात वेगळी.. अन्…

करण जोहरकडून ‘धडक २’ची घोषणा; आता चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री

‘या’ तारखेला होणार चित्रपट रिलीज

मुंबई : आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर (Marathi cinema) कमाईचे विक्रम मोडीत काढले होते. प्रेक्षकांना वेड लावलेल्या या सैराटप्रमाणे २०१८ साली शशांक खेतानने दिग्दर्शित केलेला ‘धडक’ (Dhadak) चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि ईशान खट्टरने पदार्पण केले होते. धडक चित्रपटाला जेमतेमच प्रतिसाद मिळाला असला तरीही यामधील सर्व गाणी सूपरहिट झाली होती. त्यातच आता बॉलीवूड (Bollywood) निर्माता करण जोहरने (Karan Johar) ६ वर्षांनी या सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. ‘धडक २’ (Dhadak 2) हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये नवी जोडी बघायला मिळणार असल्याचे करण जोहरने सांगितले.

‘धडक २’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत. तर या सिनेमात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अ‍ॅनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निर्माता करण जोहर याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची घोषणा केली. यासोबत ही गोष्ट थोडी वेगळी आहे, ‘एक होता राजा आणि एक होती राणी…त्यांची जात वेगळी होती…गोष्ट संपली’असं कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

या तारखेला रिलीज होणार ‘धडक २’

झी स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन आणि क्लाउड ९ पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्मिती होत असलेला हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. त्यासोबत करण जोहरने दिलेल्या हटके कॅप्शनमुळे हा चित्रपट किती हिट करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -