Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीpre wedding : बॉलिवू़डचे व-हाड निघालंय इटलीला!

pre wedding : बॉलिवू़डचे व-हाड निघालंय इटलीला!

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार

एकच चर्चा! प्री-वेडिंगला कोणकोण बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्म करणार?

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याआधी मार्च महिन्यापासून त्यांच्या प्री-वेडिंगला (pre wedding) सुरुवात झाली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात तीन दिवस ग्रँड प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा अनंत-राधिका दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन इटलीतील क्रूजवर करायला सज्ज झाले आहेत. अनंत-राधिकाच्या या क्रूज पार्टीसाठी बॉलिवूडदेखील पुढील काही दिवसांसाठी बंद असणार आहे. सलमान खानपासून (Salman Khan) आलिया भट्ट (Alia Bhatt) ते रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor) अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.

एअरपोर्टवर सर्वात आधी रणबीर कपूर, आलिया भट्ट आपली लेक राहासोबत स्पॉट झाले. आलिया आणि रणबीर अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. यंदा अनंत-राधिकाच्या सेकंड प्री-वेडिंगला ते लेक राहासोबत हजेरी लावणार आहेत. रणबीर, आलिया आणि राहासोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याचे खास मित्र अयान मुखर्जीदेखील दिसून आले. बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मुंबईतील एका प्रायव्हेट एअरपोर्टवर इटलीला जाण्याआधी स्पॉट करण्यात आले.

मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे दुसरे प्री-वेडिंग २८ ते ३० मे दरम्यान पार पडणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. सलमानलादेखील एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.

क्रिकेटर एमएस धोनी आपली लेक जीवा आणि पत्नी साक्षी धोनीसह अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला रवाना झाला आहे. रणवीर सिंहदेखील (Ranveer Singh) रवाना झाला आहे.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी सध्या प्रत्येकजण उत्सुक आहे. याआधी गुजरातमध्ये झालेल्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनला आंतरराष्ट्रीय गायिका रेहानासह दिलजीत दोसांझ, सलमान, शाहरुख आणि आमिर खानसह अनेक कलाकार सहभागी झाले होते. आता अनंत-राधिकाच्या प्रे-वेडिंगला शकीराचा परफॉर्मन्स असू शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील प्री-वेडिंगला परफॉर्म करताना दिसतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -