Wednesday, July 17, 2024
Homeराशिभविष्यWeekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २६ मे ते १ जून २०२४

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २६ मे ते १ जून २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २६ मे ते १ जून २०२४

सहयोग लाभणार आहे

मेष : आपला जोडीदार तसेच परिवारातील व्यक्तींचा सहयोग लाभणार आहे. व्यवसायातील काही कामे महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्ण कराल. आपल्याला मित्रांचा व सहयोगी व्यक्तींचा पूर्ण सहकार लाभणार आहे. व्यापार, व्यवसायांमध्ये आपले वडील किंवा ज्येष्ठ व्यक्ती यांच्या सल्ल्याचा फायदा होणार आहे. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन, त्यावर निर्णय घ्या, फायद्यात राहाल. व्यापार, व्यवसायांमध्ये नवीन करारमदार करताना आपण सतर्क असावे. या कालावधीमध्ये शत्रू तोंड वर काढू शकतच नाही, ते पूर्णपणे नामोहरम होणार आहे. स्पर्धकांवर मात कराल.

चांगला समन्वय असेल

वृषभ : आपल्या भावनांवर संयम ठेवा. कोणताही निर्णय घेताना भावनाशील होऊ नका. प्रत्यक्षातील वस्तुस्थिती आकलन महत्त्वाचे ठरेल. कोणतेही असे कार्य करू नका की, तुम्ही स्वतः अडचणीत याल. प्रेमिकांसाठी चांगला कालावधी. सरकारी कामे करणाऱ्यांसाठी महत्त्वाची कामे सोपवली जातील. मात्र या कालावधीमध्ये महिलांसोबत काम करताना सावधगिरी बाळगा. सप्ताहाच्या मध्यावधी काळामध्ये संततीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना वाहन सावकाश चालवा, ही सूचना देणे महत्त्वाचे आहे. दाम्पत्य जीवनासाठी हा कालावधी चांगला आहे. कुटुंबातील सदस्य एकमेकांना सहयोग करतील, त्यांच्यामध्ये चांगला समन्वय असेल.

सहकार्य मिळेल

मिथुन : टेक्निकल गोष्टीमध्ये काम करणाऱ्यांना अतिशय उत्तम कालावधी आहे. त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम यश मिळणार आहे. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून घरांमध्ये पाहुण्यांची ये-जा राहील. मुलांच्या फर्माईशी पूर्ण करण्यामध्ये आपला जोडीदार व्यस्त राहील. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सन्मान होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सप्ताहाच्या अखेरीस आपणास नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे; पण नवीन कामे विचारपूर्वक घ्या. शेअर मार्केटच्या संबंधित व्यक्तींनी विचारपूर्वकच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. शिक्षणाचे मार्ग खुले होतील. गुरुजनांचे सहकार्य मिळेल.

वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे

कर्क : घरातील वातावरण बिघडणार नाही, याची काळजी आपण घ्या. कुटुंबातील सदस्यांशी लहान-मोठ्या कारणांवरून जाणीवपूर्वक वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात असेल; पण ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यावयाची आहे, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेची तारीख पुढे जाऊ शकते किंवा स्वतः तरी आजारी पडू शकता. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी कोणत्या तरी मोठ्या अधिकारी व्यक्तीची ओळख असण्याची आवश्यकता भासणार आहे. म्हणजेच मोठ्या व्यक्तीचे सहाय्य घ्यावे लागणार आहे. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.

मार्ग प्रशस्त होतील

सिंह : शिक्षणासाठी हा कालावधी आपणास चांगला आहे. नवीन कुठला तरी छोटा कोर्स पूर्ण करण्याकडे आपले लक्ष राहील. कोणत्याही टेक्निकल साइडमध्ये आपल्याला विशेष यश मिळेल. मात्र कोणत्याही कारणास्तव आळस करू नका. जास्त कष्ट आपणास यश देणारे आहे. विद्यार्थी वर्गाला आपण घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. अपेक्षित यश मिळून उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. कुटुंब परिवारातून मदत मिळेल. तसेच गुरुजनांचे आशीर्वाद मिळतील. शैक्षणिक भाग्योदय होईल. परदेशगमनाची शक्यता. नोकरीच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राहील.

यश येणार आहे

कन्या : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला यश येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपण पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरताना पाहून आनंद होईल. नवीन संकल्पना तसेच नवीन तंत्रज्ञान वापरून, आपला व्यवसाय विशिष्ट जागेवर नेऊन ठेवण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धकांवर मात कराल. पद आणि प्रतिष्ठा याच्यामध्ये वृद्धी होईल. काही जुनी थांबलेली कामे परत सुरू होतील. आपल्याला जर काही गुंतवणूक करायची असेल, तर सोन्यामध्ये केलेली चांगली ठरेल. आर्थिक आलेख उंचावेल.

कुसंगत टाळा

तूळ : रोजच्या कामासह इतर कामांमध्ये जास्तीचा लोड वाढणार आहे. त्या प्रमाणात आपली एनर्जी लेव्हल कमी वाटणार आहे. आपण परिस्थितीशी सामना करण्यासाठी खूप प्रयत्न कराल; पण समाधान आपणास कमीच वाटेल. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपणास आत्मविश्वास कमी असल्याचे भासेल; पण आपण आत्मविश्वासाने कामे करावीत. आर्थिक गुंतवणूक करताना खूप सावधानता पाळली पाहिजे. विद्यार्थ्यांना हा कालावधी खूप महत्त्वपूर्ण आहे. कठीण परिस्थितीमध्ये आपण यश संपादन कराल. मात्र वेळेचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरेल. तसेच कुसंगत टाळा.

यश खेचून आणाल

वृश्चिक : आपल्या आजूबाजूला अनुकूल वातावरण असेल. बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट बघत होता. ते काम मार्गी लागल्यामुळे आपल्या उत्साहात व आनंदात भर पडेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच उत्साही राहाल. आपल्यामध्ये उच्च प्रतीचा उत्साह असल्यामुळे, कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार असणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण यश खेचून आणाल. कुठलेही काम आपण धाडसाने कराल, मात्र अतिआत्मविश्वास टाळणे महत्त्वाचे ठरेल.

विवाह ठरतील

धनु : कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. ज्यांचे विवाह करण्यामध्ये अडचणी येत होत्या, अशा अडचणी दूर होऊन, त्यांचे विवाह ठरतील. विवाहविषयक बोलणी यशस्वी ठरतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुख-शांतीपूर्वक चालेल. मात्र आपल्या संततीविषयी काही प्रकृतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संततीच्या भविष्याविषयी आपण चिंतीत असाल. गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणे.

प्रलोभने टाळा

मकर : आपण जर सरकारी क्षेत्रात काम करत असाल, तर या कालावधीमध्ये आपल्याला अपेक्षित सफलता मिळणार आहे. पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळेल. आपल्या कार्यकक्षेत वृद्धी होईल. तसेच जबाबदाऱ्याही वाढतील. आपली कार्य आपण आपल्या कार्यकक्षेमध्ये पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. लहान-मोठी प्रलोभने टाळा, फायद्यात राहाल. फायनान्स आणि रियल इस्टेट क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल, तरी सुद्धा आपणास चांगले परिणाम मिळणार आहेत. ज्यांचे कमिशन एजंटचे काम आहे, त्यांनाही या कालावधीमध्ये चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

धनप्राप्ती होऊ शकते

कुंभ : आर्थिकदृष्ट्या हा कालावधी आपणासाठी अतिउत्तम आहे. आपणास एकापेक्षा जास्त ठिकाणाहून धनप्राप्ती होऊ शकते. टेक्नॉलॉजी, मीडिया, सोशल मीडिया अशा माध्यमातून आपणाला धनप्राप्ती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना महिला सहकार्याकडून सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे आपण जास्तीची अर्थप्राप्ती करू शकता. एकमेकांच्या सहकार्यामुळे आपण पुढे जाऊ शकता. विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित असेल. आपले शिक्षक तसेच आपले पालक आपणासाठी पूर्ण सहयोग देतील. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे स्वप्न साकार होऊ शकते.

बढतीचे योग                                               

मीन : बुद्धिजीवी जातकांना तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळींना व नोकरी करणाऱ्यांना सदरील सप्ताह अविस्मरणीय ठरू शकतो. उच्च व प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. त्यांची ओळख पुढे वाढणार आहे, त्याचा उपयोग आपणास लाभप्रद होणार आहे. जे जातक बेकार आहे, त्यांना नोकरी मिळेल. जे जातक नोकरी करत आहे, त्यांना बढतीचे योग आहेत. आपण जर कुठली जमीन खरेदी किंवा विक्रीसाठी विचार करत असाल, तर ते आपणासाठी लाभदायक आहे. पण त्यामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, तरीही यश मिळेल. विवाहासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -