मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी रवाना झाला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला शुभेच्छासह या मेगा इव्हेंटसाठी रवाना केले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोचसह खेळाडू वेस्ट इंडिज आणि अमेरिका क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी उड्डाण केले. मुंबईमधून भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न घेऊन गेली.
आयीसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न घेऊन भारतीय संघ शनिवारी २५ मेला रवाना झाला. बीसीसीआयने टीम इंडियाचे खेळाडू या बहुचर्चित स्पर्धेसाठी रवाना झाल्याची माहिती दिली. टीम बससमधून कर्णधार रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यांचा उतरण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबई एअरपोर्ट येथून टीमने उड्डाण केले. १ ते २९ जूनदरम्यान आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.
कर्णधार रोहितसोबत कोण कोण
एअरपोर्टचा जो फोटो समोर आला आहे त्यात कर्णधार रोहित शर्मा, विकेटकीपर ऋषभ पंत, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह दिसले. तर अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल एकत्र दिसले.
The wait is over.
We are back!
Let’s show your support for #TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/yc69JiclP8
— BCCI (@BCCI) May 25, 2024
भारतीय संघाचा कार्यक्रम
भारताला ग्रुप एमध्ये पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड आणि अमेरिकेसोबत ठेवण्यात आले आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकपची सुरूवात ५ जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी ९ जूनला होणार आहे. १२ तारखेला भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. १५ जूनला भारताचा सामना कॅनडाच्या संघाशी होणार आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा(कर्णधार), हार्दिक पांड्या(उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), संजू सॅमसन(विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज