Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाजवकील निघाली चोर

वकील निघाली चोर

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

आपण कितीही वस्तू सांभाळायचा प्रयत्न केला, तरी चोर आपल्या नकळत चोरी करून प्रसार होतच असतो. प्रवासात, कार्यालयात कुठे ना कुठे आपल्याला हे चोर भेटतच असतात. ज्यांच्यासोबत आपण बोलतो आहे, तो चोर आहे, याचा थांगपत्ताही आपल्याला लागत नाही. जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा आपलं लक्ष आपल्या बॅगेकडे व किमती सामानाकडे नसते. त्याचवेळी या चुकीचा लोक फायदा घेऊन, सामान घेऊन पसार होतात.

न्यायालयामध्ये काही वकील हे त्या न्यायालयाचे लाइफ मेंबर असल्यामुळे, त्यांना त्या ठिकाणी लॉकर उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचे सामान म्हणजे बॅग व इतर डॉक्युमेंट्स त्या लॉकरमध्ये ठेवलेले असतात. पण काही वकील न्यायालयांमध्ये हे नियमित नसल्यामुळे, वेगवेगळ्या कोर्टातून ते काम करत असतात. त्यामुळे त्यांना विशिष्ट कोर्टांमध्ये नोकर उपलब्ध नसतात. त्यामुळे ज्या कोर्टामध्ये त्यांचे काम आहे किंवा केस आहे त्या कोर्टात ते आपले बॅग व डॉक्युमेंट घेऊन बसतात. तसेच बॅग किंवा डॉक्युमेंट्स तिथे ठेवून, इतरत्र काम करत असतात. कारण वकिलांना माहीत असतं की, प्रत्येक कोर्टामध्ये समोर बसलेले, हे पोलीस आहेत. त्याच्यामुळे कोणीही त्यांच्या बॅगा तिथून घेऊन जाऊ शकत नाही.

अशीच एक घटना कुर्ला कोर्टामध्ये घडली. एका महिला वकिलाने आपली बॅग आणि महत्त्वाची कागदपत्रे एका ठिकाणी ठेवून, ती दुसऱ्या कोर्टामध्ये कामानिमित्त निघून गेली. काही वेळात तिथून येताच, त्या जागेवरती त्या महिलेचे कागदपत्रे आणि बॅग सापडली नाही.

त्या महिला वकिलाने आपल्या बॅगेसंदर्भात महिला वकिलांकडे चौकशी केली असता, त्यांनी थोड्या वेळापूर्वी ती बॅग होती व आता नाहीय असे सांगितले. त्या बॅगेमध्ये तिचे आवश्यक असलेले सर्व कागदपत्र होते एवढेच नाही, तर आरोपीकडून मिळालेली कॅश त्या बॅगेत ठेवलेली होती. ती कॅश तिला आता आपल्या सीनियरकडे द्यायची होती. म्हणून तिने जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये बॅग आणि सोबतचा ऐवज हरवल्याची तक्रार दाखल केली. त्या बॅगमध्ये ४२ हजारांपर्यंत तो ऐवज जात होता. पर्स, बॅग, हेडफोन, चार्जर, कागदपत्रे, ओळखपत्र, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पावर बँक, चांदीचा कॉइन व रोख रक्कम असं साहित्य त्या बॅगेमध्ये होते. फिर्यादी वकील अनोळखी व्यक्तीविरुद्ध कलम ३८० भादंवि अन्वये दाखल पत्र गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस उपायुक्त परिमंडळ ०५ व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी कुर्ला कोर्टाबाहेरील सीसीटीव्ही चेक केले असता. वकील पोषाखातील महिला चोरीच्या बॅग घेऊन जाताना दिसली. सदर महिलेबाबत कोर्टात विचारपूस केली असता, ती याच कोर्टमधील महिला वकील असल्याचे समजले. पोलीस यांनी तिचा पत्ता शोधून काढला व तिच्यापर्यंत पोहोचून त्या महिलेला अटक करण्यात आली. तिच्याकडून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली. तसेच महिला वकील आरोपीने मुंबईमधील इतरही कोर्टमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे तिच्याकडून इतरही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपींना शिक्षा करणारे वकीलच जर चोर निघाले, तर समाज नेमका आशेने कोणाकडे बघेल आणि विश्वासाने आपल्या कागदपत्रांसह वकील महिला, वकील पुरुष न्यायालयात आपली बॅग ठेवतात. त्या न्यायालयात जर चोरी होत असेल, तर न्यायालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, वकिलाने तरी विश्वास नेमका कोणावर ठेवायचा.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -