Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीPravin Darekar : ४ जूननंतर संजय राऊतांचं फुटलेलं थोबाड दिसेल!

Pravin Darekar : ४ जूननंतर संजय राऊतांचं फुटलेलं थोबाड दिसेल!

संजय राऊत भ्रमिष्ट झाल्याने काहीतरी काढून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करतात

प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या भाजप नेत्यांवर आरोप करत एक नवा दावा केला. या नेत्यांनी नागपुरात नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवाचा कट रचला होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपकडून टीकेची झोड उठली आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीदेखील संजय राऊतांना तिखट शब्दांत फटकारलं आहे. ‘४ जूननंतर संजय राऊतांचं फुटलेलं थोबाड दिसेल’, असा घणाघात त्यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, “४ जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल. कारण देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे, हे योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभांमधून अगदी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे मोदी-योगी असं चित्र उभं करू नका. संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झाले आहेत म्हणून अशा प्रकारचं शोधून शोधून, काहीतरी काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात.”

पुढे ते म्हणाले, “सामनाच्या दाव्याला आम्ही काडीमात्र किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विजय आणखी भक्कम व्हावा, यासाठी काय योगदान दिलं आहे ते नागपूरवासियांना माहीत आहे. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले, संजय राऊत टीका करताना सुद्धा काय नेमकं बोलायचंय, हे निश्चित करून घ्या.”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -