Nashik IT Raid : नाशिकच्या सराफा व्यावसायिकाकडून तब्बल २६ कोटींचे घबाड हाती!

Share

आयकर विभागाची मोठी कारवाई

नाशिक : नाशिकमधील (Nashik) काही सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाने अचानक धाडी (Income Tax Raid) टाकल्याने त्यांचे धाबे दणाणले. २४ मे पासून नाशिकच्या कॅनडा कॉर्नर (Canada Corner Nashik) भागातील सुराणा ज्वेलर्स तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली होती. व्यावसायिकांच्या घरांची आणि दुकानांचीही तपासणी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या धाडींमधून तब्बल २६ कोटींची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.

हे व्यावसायिक सोने चांदीच्या दागिन्यांच्या व्यवहारांची माहिती लपवत असल्याचा आयकर विभागाला संशय होता, त्यातूनच या धाडी टाकण्यात आल्या. तब्बल ३९ वाहनांमधून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये खळबळ उडवली. ही कारवाई करताना नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. त्यांनी एकूण २६ कोटींची रोकड जप्त केली आहे.

जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले, शिवाय सात कार बोलवाव्या लागल्या. सलग ३० तास ही कारवाई चालू होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली. ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले होते. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यातदेखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.

नाशिक शहरात एका सराफा व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांत सध्या तणावाचे वातावरण आहे.

Recent Posts

MI vs CSK Live Score, IPL 2025 :  रोहित-सूर्याचे वादळ, धोनीच्या चेन्नईवर मुंबईचा ९ विकेटनी विजय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…

45 minutes ago

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

7 hours ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

7 hours ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

7 hours ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

7 hours ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

8 hours ago