Monday, July 22, 2024

प्रेमकहाणी

“जुनं जुनं आठवण्यात नवी नवी गंमत असते.” “हळुवार थंड वाऱ्याची झुळुक असते.” सर म्हणाले. ती पुन्हा नव्याने सुखविते. म्हणूनच हवी हवीशी वाटते. कॉलेजचे दिवस आज पुन्हा एकदा आठवले हेमंत सर.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

(वैदेही हेडसरांच्या समोर बसली होती. विठू शिपाई बाहेर पहारा देत होता. पुढे…)

तुला आठवतात ते तरुणपणीचे दिवस वैदेही?”
“अगदी चित्रपटासारखे आठवतात.”
“तरी तू मला हेमंत म्हणून हाकारत नाहीस.”
“तेव्हाची गोष्ट वेगळी होती मोठे सर. आताची गोष्ट वेगळी आहे.”
“आता काय बदललं आहे? मी तोच हेमंत आहे नि तूही तीच वैदेही आहेस.”
“आपण शाळेचे हेडसर आहात नि मी साधी शिक्षिका!”
“त्याने आपल्या मैत्रीत खंड पडू नये.”
“तरी पण हुद्दा आडवा, उभा, मधे येणारच. मी जाते कशी.” ती उठणार एवढ्यात हेडसरांनी दाटले.
“बैस.”
“बसते.”
“आता मुकाट्याने उत्तरे द्यायची फक्त.”
“देते. सर”
“आता मला सांग… तुझे पूर्ण नाव काय आहे?”
“मस्टरवर पूर्ण नाव आहे मोठे सर.”
“धिस इज अॅन ऑर्डर बाय दि हेड ऑफ दि स्कूल.”
“मी कॅटलॉग आणते. मोठे सर.”
“मी कॅटलॉग मागितला? नाही ना? मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे.” ते अधिकारवाणीने म्हणाले.
“ऐका. मिसेस वैदेही हेमंत देशपांडे.” ती उच्च स्वरात म्हणाली.
“आपले अहो हेमंत देशपांडे?”
“अहो हेमंत हे जगात एकट्या तुमचं नाव आहे का सर?”
“नाही. निश्चितच या नावाने डझन दोन डझन हेमंत जगात जगत असतील.”
“आणि देशपांडे इज सच अ कॉमन सरनेम.”
“हो. तेही खरंच! देशपांडे, कुलकर्णी, जोशी, अप्पा यांची संगत नको रे बाप्पा!” सर पुन्हा निर्मळसे हसले. “परत परत लहान होताय, मोठे सर तुम्ही!”

“अगं वैदेही त्यात पण गंमत आहे बरं.”
“हो. आहे खरी. जुनं जुनं आठवण्यात नवी नवी गंमत असते.”
“हळुवार थंड वाऱ्याची झुळुक असते.” सर म्हणाले.
ती पुन्हा नव्याने सुखविते.
म्हणूनच हवी हवीशी वाटते. सरांनी सांगता केली.
“कॉलेजचे दिवस परत आठवले हेमंत. आपले, मोठे सर!”
“चालेल गं. मोठे सरपेक्षा हेमंत बरं वाटतं.”
“खरंच मोठे सर?”
“हेमंत, हेमंत, हेमंत!” त्रिवार जयजयकार करीत सर म्हणाले.
“बरं हेमंत!”
“आता कसं थंडगार झऱ्याच्या पाण्यात बसल्यागत वाटलं.”
“हा झरा वाहतो, धबाधबा धबधबा सांडितो पाणी हे थबाथबा थबथबा”
“मी झऱ्यात बसतो, भिजतो सचैल तेथे
मन निर्मल निर्मल पुन्हा पुन्हा गं होते.”
“बसुयात जोडीने हाती हात धरून
ही मौज जगूया पुन्हा पुन्हा जोडीनं.”

“सर, हेडसर, नववी ‘अ’ च्या सावली देशमुखला मैदानात चक्कर आली.” विठून धावत धावत निरोपनामा दिला.
“चला, बाई डॉक्टरला बोलावूया.” सर घाईघाईने खुर्चीतून उठले. “तुम्ही फोन करता का? मी मैदानात जातो.”
“हो हो. अजिबात काळजी करू नका. डॉ. अडकर दहाव्या मिनिटाला इथे मैदानात हजर होतील.” “मला वाटतं मैदानात शो… शा… नको. मी माझ्या खोलीत घेऊन येतो. चार स्काऊटवाले पकडतो नि आणतो. इथे ती सिकरून रेडी ठेवा.”
“काळजीच नको. मी सगळी तयारी अगदी जय्यत करते.”

सर ग्राऊंडकडे धावले. चार दणकट पोरांनी सावलीला पेशंट्स रूमवर आणले. तिला प्रथमोपचार दिले.
डॉक्टरसाहेब आले. त्यांनी सवालीला तपासले.
“मुलांनो, तुम्ही परत जा ग्राऊंडवर.” डॉक्टरसाहेबांनी फर्माविले. पोरंच ती! उड्या मारीत पळाली मैदानावर.
“काय झालं? चक्कर आली?” त्यांनी सावलीला विचारलं.
“हो डॉक्टर.”
“पाळी येते का?”
“हो डॉक्टर काका.”
“एवढ्यात आली होती का?”
“नाही डॉक्टर काका.”
“बरं बरं. आपण औषध देऊ छानपैकी. मस्त बरी करू पेशंटला.”
“मला चक्कर कशामुळे आली डॉक्टर?” तिने निरागस प्रश्न केला.

­

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -