Saturday, June 29, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलपरीताई : कविता आणि काव्यकोडी

परीताई : कविता आणि काव्यकोडी

एकदा ना स्वप्नात
आली परीताई
आकाशात फिरण्याची
केवढी तिला घाई

मी म्हटलं परीताई
चल माझ्या घरी
करेन मी तुझ्यासाठी
आमरस-पुरी

परीताई तुझे पंख
फुलपाखरासारखे छान
सारखी उडत असतेस
आज इथेच थांब

परीताई तुझी जादू
दाखवशील का मला
चा‌कलेटचा डब्बा
देईन मी तुला

परीताई एक गोष्ट
सांगू का तुला
जादूची छडी तुझी
दे ना आज मला

छसडीचा साऱ्यांना
दाखवेन मी धाक
खोडी काढेल त्याचे
नकटे करीन नाक

असं मी म्हणताच
परीताई हसली
झोप गेली उडून
आई समोर दिसली

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) दाणे टिपायची
तिला सदा घाई
पाहून बाळ तिला
हरखून जाई

येताच चिव चिव
गाणे ती गाते
दाणे टिपून
कोण उडून जाते?

२) सरकारी कागद
कधी येतो घेऊन
आनंदाची बातमी
कधी जातो देऊन

पत्राच्या दुनियेत
फिरत हा असतो
खाकी पोशाखात
दारी कोण दिसतो?

३) पन्हे, आईस्क्रीम
थंडगार पाणी
सुतीचे कपडेच
फिरे घालुनी

दुपारचे तापमान
फारच चढते
कोणत्या ऋतूत
हे सारे घडते?

उत्तर –

१)चिमणी
२) पोस्टमन
३) उन्हाळा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -