Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीBank Holidays : आताच करा महत्त्वाची कामे; जूनमध्ये १० दिवस बँकांना टाळे

Bank Holidays : आताच करा महत्त्वाची कामे; जूनमध्ये १० दिवस बँकांना टाळे

मुंबई : मे महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून आगामी जून महिन्यात बँकांना (Bank) अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद (Bank Holiday) असतात. मात्र जून महिन्यात त्या सुट्ट्यांव्यतिरिक्त इतर काही दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुमचे महत्त्वाचे काम अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी बँकेशी संबंधित कामांचे आताच नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार जून महिन्यात एकूण दहा दिवस बँका बंद असणार आहेत. म्हणजेच उरलेल्या २१ दिवसांतच तुम्हाला तुमचे बँकेचे काम करावे लागेल. या दहा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय, क्षेत्रीय सुट्ट्या तसेच रविवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्यांचा समावेश असणार आहे. जाणून घ्या कोणत्या तारखेला असणार बँका बंद.

‘या’ दिवशी बँका राहतील बंद

  • २ जून रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील
  • ८ जून रोजी दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद आहेत
  • ९ जून रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
  • १० जून रोजी श्री गुरु अर्जुन देव यांचा बलीदान दिन आहे. त्यामुळे या दिवशी पंजाबमध्ये बँका बंद असणार आहेत.
  • १६ जून रोजी रविवार असल्याने बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल.
  • १७ जूनला बकरीदनिमित्त बँका बंद राहणार आहेत
  • २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे. त्यामुळे अनेक राज्यांत या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे.
  • २२ जूनला चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल.
  • २३ जून रोजी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
  • ३० जून रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -