Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीCannes film festival : यंदाचा कान्स भारतासाठी खास! अनसूया सेनगुप्ताने जिंकला सर्वोत्कृष्ट...

Cannes film festival : यंदाचा कान्स भारतासाठी खास! अनसूया सेनगुप्ताने जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान

हा पुरस्कार पटकावणारी अनसूया पहिली भारतीय

पॅरिस : यंदा जगभरातील मोठ्या फेस्टिव्हल्समध्ये गणल्या जाणार्‍या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes film festival) भारतीय चित्रपटांचा (Indian Films) दबदबा आहे. भारतातील अनेक चित्रपटांना यात विविध श्रेणींमध्ये नामांकने मिळाली असून ही भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. मराठी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिच्या ‘ऑल वुई इमॅजिनव अॅज लाईट’ (All we imagine as light) या सिनेमाला कान्समध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. यानंतर भारतीयांची मान उंचावणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. यंदा कान्समध्ये भारताला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला आहे. अनसूया सेनगुप्ता (Anasuya Sengupta) ही कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय ठरली आहे. ‘द शेमलेस’मधील (The Shameless) तिच्या अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

अनसूया सेनगुप्ता ही मूळची पश्चिम बंगालमधील कोलकाताची आहे. तिने ‘द शेमलेस’मधील तिच्या अभिनयासाठी अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि लिहिलेल्या या चित्रपटात अनसूयाने रेणुका नावाची भूमिका केली होती. तिचं पात्र एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर दिल्लीच्या वेश्यागृहातून पळून जाते. या चित्रपटात ओमरा शेट्टी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. अनसूया हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

अनसूयाने तिचा पुरस्कार जगभरातील समलैंगिक समुदायाच्या शौर्याला समर्पित केला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात ती म्हणाली, “सर्वांच्या समानतेसाठी लढणासाठी तुम्ही समलिंगी असण्याची गरज नाही. आपण फक्त सभ्य माणूस असायला हवं.”

कोण आहे अनसूया?

अनसूया सेनगुप्ता मूळची कोलकाताची आहे. तिने मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं आहे. ती सध्या गोव्यात राहते. ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्स शोचा सेट तिने डिझाइन केला होता. अनसूयाने जाधवपूर विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. याआधी ‘द कोलकाता’ला दिलेल्या मुलाखतीत अनसूया म्हणाली होती, “कान्समध्ये आमच्या चित्रपटाला नॉमिनेशन मिळाल्याचं कळाल्यावर मी आनंदाने खुर्चीवरून उडी मारली होती!”

यंदाचा कान्स भारतासाठी खास

७७ वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ भारतासाठी खूप खास राहिला. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ला रिलीजच्या जवळपास ४८ वर्षांनंतर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग मिळालं. यंदाच्या सोहळ्यात अनेक भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार, एन्फ्लूएन्सर व उद्योजकांनी हजेरी लावली. भारतीय चित्रपट आणि कलाकारांना या महोत्सवात अनेक श्रेणींमध्ये नामांकन मिळालं होतं. त्यातच आता एका भारतीय अभिनेत्रीने ‘कान्स’ मध्ये पुरस्कार मिळवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -