Sunday, June 15, 2025

चकमकीत नक्षली ठार

चकमकीत नक्षली ठार

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील बेलपोचा गावाजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.


या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली. किरण चव्हाण यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला व घटनास्थळावरून एक शस्त्र जप्त करण्यात आले.


यापूर्वी १८ मे रोजी सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना तोलनाई व तेत्राई गावांदरम्यानच्या परिसरात घडली होती.


१० मे रोजी पिडिया गावाजवळील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. ज्या ठिकाणी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली ते ठिकाण गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.

Comments
Add Comment