Friday, June 28, 2024
Homeक्राईमDombivli MIDC news : डोंबिवली स्फोट प्रकरणातील कंपनीच्या मालकाच्या आईची सुटका!

Dombivli MIDC news : डोंबिवली स्फोट प्रकरणातील कंपनीच्या मालकाच्या आईची सुटका!

तर मालकाला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीच्या (Dombivli MIDC) फेज २ मधील अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाच्या भीषण आवाजानंतर काही वेळातच आगीचे व धुराचे लोळ परिसरात पसरले होते. या भीषण स्फोट दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक मलय मेहताला (Malay Mehta) काल अटक करण्यात आली. या प्रकरणी मलय मेहता यांच्या आई मालती मेहता (Malati Mehta) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध आढळून न आल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे.

स्फोट प्रकरणात मलय मेहताला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याला २९ जूनपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात मलय मेहता याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा करण्यात आला होता. त्याचबरोबर या स्फोट प्रकरणात त्याची आई मालती मेहता यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. गुन्हे शाखेने नाशिकमध्ये ही कारवाई केली होती. मालती मेहता ह्या देवदर्शनासाठी जात होत्या, त्यावेळी गुन्हे शाखेने चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र या चौकशीत त्यांचा कंपनीशी कुठला संबंध नसल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान कल्याण सत्र न्यायालयात मालक मलय मेहतासह संचालक असलेल्या त्याच्या आईलाही कोर्टात हजर करण्यात येणार होतं. पण मलय मेहताची आई वयस्कर असल्याने त्यांना घरीच ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. शिवाय पतीच्या मृत्यूनंतर कंपनी मुलाच्या नावावर आहे. त्यात त्यांचा कुठलाच संबंध नसल्याने पोलिसांनी चौकशी करत त्यांना घरी सोडले असल्याची माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -