उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?

Share

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. उध्दव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा सवाल शेलार यांनी केला.

मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवसापासून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. प्रथम त्यांनी गजधरबांध परिसरातील नाल्याची पाहणी केली. तर काल पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा या नाल्यांची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड (पश्चिम),अवधूत नगर नाला दहिसर (पूर्व ) एन. एल. कॉम्प्लेक्स जवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली.

यावेळी आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी करतोय. जी आकडेवारी पालिका सांगतेय आणि प्रत्यक्ष चित्र यामध्ये तफावत आहे. ९५ तक्के सफाईचा दावा वळणई नाल्याचा केला जातोय, पण प्रत्यक्षात अद्याप गाळ नाल्यातून काढण्यात येतो आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली त्याचे स्वागत करीत आमदार आशिष शेलार म्हणाले की, शिंदे हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईकरांची काळजी केली. यापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत होते.

मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उध्दव ठाकरे कुठे आहेत? इथे नाल्यावर मर्दूमकी का दाखवत नाहीत, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का? असा खोचक सवालही आमदार शेलार यांनी केला.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे स्थानिक आमदार, नगरसेवक, उत्तर मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा पदाधिकारी आणि पालिका अधिकारी सहभागी झाले होते.

Recent Posts

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

21 mins ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

23 mins ago

Worli Hit and Run : ‘कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!’ गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…

1 hour ago

Dombivali Fire : डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! सोनरपाड्यात कारखान्याला भीषण आग

परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…

1 hour ago

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

2 hours ago

Jalna News : अ‍ॅक्शन मोड! बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड

कपाट भरून गर्भपाताची औषधे, लाखोंची रोकड पाहून अधिकाऱ्यांच्या उंचावल्या भुवया जालना : महाराष्ट्रात गर्भवती महिलांची…

2 hours ago