गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. मे 2020 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याला अगस्त्य नावाचा 3 वर्षाचा मुलगा आहे. हे जोडपे वेगळे होणार असल्याचा दावा केला जात आहे.नताशाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून ‘पांड्या’ आडनाव काढून टाकल्याने या अफवा पसरल्या आहेत. तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तिने हार्दिकसोबतचे तिचे सर्व फोटो हटवल्याचा दावा खोटा ठरला; तिच्या खात्यात अजूनही अनेक फोटो आहेत ज्यात हार्दिकसोबतच त्यांचा मुलगा अगस्त्य आणि कुटुंबातील इतर सदस्य दिसुन येत आहेत.
View this post on Instagram