Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीझारग्राम लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला

झारग्राम लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला

झारग्राम : पश्चिम बंगालमधील झारग्राम लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान भाजपा उमेदवार प्राणनाथ टुडू यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. प्राणनाथ टुडू यांच्या गाडीवर विटा फेकण्यात आल्या. केंद्रीय सुरक्षा दलांवरही हल्ला झाल्याचा आरोप आहे.

काही मतदान केंद्रांवर भाजपा एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडवेटाला जात असताना ही घटना घडली. अचानक काही लोकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान काही टीएमसीच्या गुंडांनी गाडीवर विटा फेकण्यास सुरुवात केली, असा दावा प्राणनाथ टुडू यांनी केला. यावेळी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ते जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या दोन सीआयएसएफ जवानांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असे प्राणनाथ टुडू यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -