Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Telecommunication : केंद्र सरकारची मोठी कारवाई! 'या' कारणामुळे तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद

Telecommunication : केंद्र सरकारची मोठी कारवाई! 'या' कारणामुळे तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद

जाणून घ्या नेमकं कारण काय

मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा यासह मोबाईलही आता माणसाची मुलभूत गरज बनली आहे. मोबाईलचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. मात्र याच मोबाईलबाबत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहेत.

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही मोबाईल क्रमांक हे चुकीचे कनेक्शन, बनावट ओळख व कागदपत्रांच्या आधारे घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाकडून मोबाईल कंपन्यांना ६ लाख ८० हजार मोबाईल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्यास सांगितली आहे. विभागाकडून या तपासासाठी ६० दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर पडताळणी न केल्यास हे संशयास्पद क्रमांक ब्लॉक केले जातील, अशी माहिती दिली आहे.

काय होणार कारवाई?

दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना या चिन्हांकित मोबाइल क्रमांकाची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांना ६० दिवसांच्या आत ओळखलेल्या कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुन्हा पडताळणीमध्ये कनेक्शन अयशस्वी झाल्यास ते बंद केले जाईल.

Comments
Add Comment