पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती
पुणे (प्रतिनिधी): पुणे हिट अँन्ड रन प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणी पुणे पोलिसांनी चौकशीसाठी एक इन्टर्नल कमिटी बनवली होती. त्यातच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे.दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याप्रकरणाची सविस्त माहिती दिली आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार, हिट अँन्ड रनची घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात ३०४ अ गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेचे गांभीर्य पाहाता त्यानंतर ३०४ हे कलम वाढवण्यात आले. त्याच दिवशी आम्ही बाल न्याय मंडळाकडे त्या आरोपीला सज्ञान म्हणून ट्रिट करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, तेव्हा आमची मागणी मान्य झाली नाही. त्यानंतर पुढच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच आरोपी मुलाच्या वडीलांवर आणि पब मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळाकडे मागणी केली होती, त्यानंतर आमची मागणी मान्य झाली आणि आरोपीची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, ‘आरोपीला सज्ञान म्हणून ग्राह्य धरण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे प्रोसेजर सुरू आहे. आरोपीच्या वडीलांची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा न्यायालयात दाखल करणार आहोत. या सर्व प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे सुरु आहे. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? याचा तपास सुरु आहे. अशा प्रकारे तापस करून आम्ही लवकरात लवकर न्याय देण्याचा आणि आरोपींना शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात न्यायालयात योग्य ती बाजू मांडण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत.
“आरोपीच्या पालकाने अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याचाही तपास सुरू असून या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले असा काही आरोप होत आहे. मात्र, आम्ही यावर सांगतो की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याच्या मार्गावर पोलीस चालत आहेत. यामध्ये दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झालं असं म्हणणं योग्य नाही. आता सुरुवातीला ३०४ कलम का लावण्यात आले नाही, तसेच आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का? याबाबत चौकशी सुरू आहे”, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
या घटनेतील आरोपीचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत. सुरुवातीला ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यामध्ये आमचे फॉरेन्शकि लॅबला आवाहन आहे की, दोन्ही ब्लड सॅपल आरोपीचे आहेत की नाही, याची खात्री करावी. आरोपी मद्य पित असतानाचे सीसीटीव्ही आमच्याकडे आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु आहेत. येरवडा पोलीस ठाण्यात काय घडलं याचा तपास सुरु आहे. तसेच आपल्या या कृत्यामुळे अपघात होईल, याची जाणीव आरोपीला होती. या प्रकरणाती एका एका घटनेचा बारकाईने तपास पोलीस करत आहेत. या घटनेत गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला ही बाब आमच्या चौकशीत समोर आली आहे”, असेही अमितेश कुमार यांनी सांगितलं.
या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही. ही घटना अतिशय गंभीर आहे. यामुळे कुणावरही आकस बुद्धीने काही कारवाई होणार नाही. मात्र जो कुणी दोषी असतील ते कितीही मोठे असेल, कितीही श्रीमंत असले किंवा कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी रितसर जी काही कारवाई असेल ती कारवाई केली जाईल. कायदा सर्वांना सारखा आहे. कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.