Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

Nashik IT Raid : नाशिकच्या सराफा व्यापार्‍यांमध्ये खळबळ! आयकर विभागाने टाकल्या धाडी

Nashik IT Raid : नाशिकच्या सराफा व्यापार्‍यांमध्ये खळबळ! आयकर विभागाने टाकल्या धाडी

अधिकार्‍यांकडून व्यापार्‍यांची दुकाने आणि घरांची तपासणी


नाशिक : नाशिकमधील (Nashik) काही सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाने अचानक धाडी (Income Tax Raid) टाकल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर (Canada Corner Nashik) भागातील सुरणा ज्वेलर्स तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे. आयकर विभागाकडून व्यावसायिकांच्या घरांची आणि दुकानांचीही तपासणी केली जात आहे.


हे व्यावसायिक सोने चांदीच्या दागिन्यांच्या व्यवहारांची माहिती लपवत असल्याचा आयकर विभागाला संशय आहे, त्यातूनच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. आयकर विभागाच्या दोन पथकांकडून शहरातील सराफ व्यावसायिकांची चौकशी सुरू आहे. तब्बल ३९ वाहनांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी आल्याची माहिती आहे.


मागील काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागामार्फत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आज नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात छापेमारी केली जात आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये आयकर विभागाची ही एक मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. आता या कारवाईत पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment