Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीपैसे नसतानाही करा भरघोस शॉपिंग! Google Payचं 'हे' खास फिचर

पैसे नसतानाही करा भरघोस शॉपिंग! Google Payचं ‘हे’ खास फिचर

जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करणं सोप झाल्यामुळे सहसा कोणीही खिशात पैसे घेऊन फिरत नाही. ऑनलाईन पेमेंट म्हणताच समोर पहिलं नाव येतं ते म्हणजे ‘गुगल पे’ (Google Pay). गुगलपे च्या माध्यमातून कोणतेही व्यवहार काही सेकंदातच पूर्ण होतात. या गुगल पे ने आणखी नवीन फिचर्स लाँच केले असून लोकांना पेमेंट करणं अधिक सोप्पं होणार आहे. जाणून घ्या काय आहेत ते नवीन फिचर्स.

आधी खरेदी मग पेमेंट

अनेकदा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी जाताच खात्यात पैसे नसल्याचं लक्षात येतं. अशावेळी दुकानदारासमोर आपली चांगलीच फजिती होते. त्यासोबत आवश्यक असलेली वस्तूही खरेदी करता येत नाही. अशावेळी युजर्ससाठी हे फिचर खूप फायद्याचे ठरणार आहे. गुगलने ‘Buy Now Pay Later’ हे नवीन फिचर लाँच केले आहे. म्हणजेच युजर्सच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतानाही तुम्हाला दुकानदाराला पैसे देता येणार आहे.

युजर्स ऑनलाईन पेमेंट करताना Installment चा पर्याय वापरु शकणार आहेत. जेणेकरुन युजर्स पेमेंट करताना त्यांच्या खात्यातून पैसे जाणार नाहीत. हे फिचर एकप्रकारे क्रेडिट कार्ड म्हणून वापरता येणार आहे. त्यामुळे अनेकांसाठी हे फिचर चांगला पर्याय ठरणार आहे.

गूगल ऑटोफिल

Chrome आणि Android वर Autofill इनेबल करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिनचा वापर करुन तपशील ऑटो फिल करु शकणार आहात. यानंतर तुम्हाला पेमेंट करणे सोप्पे जाणार आहे. एकदा का हे फिचर इनेबल केले तर तुम्हाला जास्त सिक्युरीटी असलेले प्रश्न विचारले जाणार आहेत.

दिसणार कार्डचे फायदे

अनेक क्रेडिट कार्डांवर खरेदीसाठी रिवॉर्ड मिळतात. परंतु कोणत्या रिवॉर्डच्या माध्यमातून आपल्याला जास्त फायदा मिळेल हे आपल्या लक्षात येत नाही. गुगल पे च्या नवीन फीचर्स नुसार, आता पेमेंट करताना तुम्हाला तुमच्या कार्डमधून मिळणारे फायदे दिसतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -