Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीBMCचा अलर्ट मोड! डोंगराळ परिसरातील रहिवाशांना दिला सतर्कतेचा इशारा

BMCचा अलर्ट मोड! डोंगराळ परिसरातील रहिवाशांना दिला सतर्कतेचा इशारा

पावसाळ्यापूर्वीच स्थलांतरीत होण्याचे आदेश

मुंबई : पावसाळ्यादरम्यान मुसळधार पावसाने (Mumbai Rainfall) दरड कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता असते. तसेच नाल्यांना पूर येण्याचीही शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर बीएमसी (BMC) अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे बीएमसीकडून आधीच डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सूचना देत स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश

विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ आणि २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या आणि डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे एस विभागाचे सहायक आयुक्त यांनी सांगितले आहे. त्यामुळे बीएमसीने दिलेल्या आदेशाचे पालन करत नागरिकांनी लवकरात लवकर स्थलांतर करावे असे सांगण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -