
दही
दही हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही दही कोणत्याही रूपात खाऊ शकता.
आवळा
आवळा हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यामुळे शरीर थंड राहते. तसेच प्रतिकारक्षमता वाढते.
पुदिना
पुदिन्याची प्रकृती थंड असते आणि उन्हाळ्यासाठी पुदिना चांगला. शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही आहारात पुदिन्याचा समावेश करू शकता. पुदिना डायजेशनमध्ये मदत करतो आणि पोटालाही शांत ठेवतो.
काकडी
काकडी थंड आणि हायड्रेटिंग असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि खनिजे असतात. काकडीच्या सेवनाने उन्हामुळे शरीराची होणारी काहिली कमी होते.
कलिंगड
कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्कृष्ट फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीर हायड्रेट राखण्यास मदत होते. यात व्हिटामिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असते.
नारळपाणी
उन्हाळ्याच्या गरम दिवसांमध्ये जर शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर नारळपाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.