मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुपरस्टार तब्बल ३० तास रुग्णालयात अॅडमिट झाल्यानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहरूख खान एअरपोर्टसाठी निघाला.
अहमदाबादच्या के केडी रुग्णालयात शाहरूख खानला दाखल करण्यात आले होते.शाहरूख खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो एअरपोर्टच्या दिशेने रवाना झाला. शाहरूख खानला बुधवारी १ वाजण्याच्या सुमारास अहमदाबादच्या के केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३० तास तो तेथे अॅडमिट होता.
आज शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सुपरस्टारच्या हेल्थबाबत अपडेट दिले. पुजाने सांगितले की शाहरूख आता ठीक आहे आणि तिने शाहरूखसाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानले.
डिहायड्रेशनमुळे बिघडली होती तब्येत
२२ मे २०२४ला शाहरूख खान हीटस्ट्रोकचा शिकार ठरला होता. डिहायड्रेशनमुळे त्याची तब्येत बिघडली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नी गौरी खानही शाहरूखची तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात पोहोचली होती.