मुरुड (प्रतिनिधी संतोष रांजणकर)– मुरुड आगारातील सर्वच बसेस दहा वर्षाच्या वरील असल्याच्या धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते समीर रांजणकर यांनी दिली आहे.
मुरुड आगारात सध्या स्थितीत ३३ बसेच कार्यरत आहेत. या बसेसचे आयुर्मान संपत आलेला आहे. सर्व बसेस दहा वर्षावरील आहेत, काही बसेस १४ वर्षापर्यंतच्या आहेत. या बसेसना मुंबईमध्ये प्रवासास बंदी आहे, तरी देखील मुरुड आगारातून या बसेस मुंबईसाठी सोडल्या जातात. या बसेस वारंवार ठिकठिकाणी रस्त्यामध्ये बंद पडत असतात, काही वेळा शहरातच बंद पडतात तरी काही बसेस ना आग सुद्धा लागलेली आहे.
अशा या स्क्रॅप करण्याच्या परिस्थितीत असलेल्या बसेस मुरुड मुंबई प्रवासासाठी सोडल्या जातात. सदर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वारंवार सामाजिक कार्यकर्ते समीर रांजणकर यांनी मुरुड आगाराची संपर्क साधला तिथेच न थांबताना पेण विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला आणि मुरुड साठी नवीन बसेसची मागणी सुद्धा केली होती. दहा-बारा बसेस मुरुड साठी नवीन येणार सुद्धा होत्या, परंतु सदर आगाराला तीन नवीन बसेस मिळाल्या होत्या, त्यातील दोन बसेस अचानक अलिबाग आगाराला ट्रान्सफर केल्या त्यामुळे मुरुड साठी फक्त एकच नवीन बस उपलब्ध आहे.
मुंबईमध्ये जाण्यासाठी किती वर्षाच्या बसेस ना परवानगी आहे, या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागविली असताना रायगड विभाग नियंत्रक पेण यांनी माहिती दिली की मुंबईमध्ये आठ वर्षाच्या आतील बसेस ना परवानगी आहे. तरीसुद्धा मुरुड आगारातील दहा वर्षावरील बसेस रोजचा मुरुड मुंबई प्रवास करीत आहेत. एक तर बस १४ वर्षे पूर्ण झालेली आहे. मुरुड बोरवली प्रवासासाठी वापरली जाते. या बसेस मधून मुरुडचे प्रवासी जीव मुठीत घेऊन रोजच प्रवास करत आहेत.
सदर मुरुड आगाराची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. या मुरुड आगाराची दुरावस्था झालेली आहे.