Tuesday, June 24, 2025

Love Jihad : अखेर सांगली येथील सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी!

Love Jihad : अखेर सांगली येथील सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी!

एक पिडीत बंधू साथीला लाखो हिंदू! दोन तरुणींच्या हत्येचा जाहीर निषेध करत हिंदूंचा मोर्चा


सांगली : राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादची समस्या अत्यंत गंभीर बनत चालली आहे. हिंदू मुलींना फसवून त्यांची क्रूरतेने हत्या करणार्‍यांना धडा शिकवलाच पाहिजे, यासाठी आता सकल हिंदू समाज एकत्र आला आहे. कर्नाटक व मुंबई येथील दोन तरुणींच्या हत्येचा जाहीर निषेध करत सांगलीतील सकल हिंदू समाज २६ मे रोजी मैदानात उतरणार आहे. अनेक अटीशर्थींचे अडथळे पार करत अखेर या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे.


कर्नाटक येथील लिंगायत समाजातील कु. नेहा हिरमठ तसेच मुंबई मानखुर्द येथील मातंग समाजातील कु. पुनम क्षीरसागर या दोन तरुणींची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात सकल हिंदू समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. लव्ह जिहादचे आणखी किती बळी? अशा प्रश्न हिंदू समाजाने उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर २६ मे रोजी सांगली येथे सकल हिंदू समाज व हिंदू वीरशैव-लिंगायत मोर्चा काढण्यात येणार आहे.


दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी तालुका सौंदत्त जिल्हा हुबळी कर्नाटक राज्यातील लिंगायत समाजातील कु. कै. नेहा हिरेमठ या कॉलेज तरणीची कॉलेज कॅम्पस मध्ये एकतफीं प्रेम प्रकरणात फसवणूक करून तिला चाकूने क्रूरपणे वार करून तिची हत्या करण्यात आली, तसेच मुंबई मानखुर्द येथील कु.कै.पूनम क्षीरसागर यां तरुणींची देखील क्रूरतेने हत्या करण्यात आली. या सर्व घटनेंसंदर्भात ठोस अशी कारवाही प्रशासनाने अद्याप केलेली नाही. आणि यासारख्या घटना महाराष्ट्रासह भारतभरात विधर्मी नेतृत्वाकडून वारंवार होतांना दिसता आहेत. या सर्व घडलेल्या घटनांनच्या अनुषंगाने सकल हिंदू समाज आणि लिंगायत समाजाकडून व सांगली येथील अनेक हिंदुत्वादी संघटनांनकडून भव्य असे मोर्चाचे आयोजन सांगली येथे दिनांक २६ मे रोजी ठीक सायंकाळी ४:३० वाजता करण्यात आले आहे. तसेच सदर मोर्चात विविध मागण्या देखील करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्रात लव जिहाद,धर्मांतरण विरोधी कठोर कायदा करावा या प्रमुख मागण्या मोर्चात करण्यात येणार आहे.


तसेच सदर मोर्चात प्रखर हिंदुत्वादी वक्ता म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्रात आहे ते म्हणजे नितेश राणे, तेलंगणाचे हिंदुत्वादी विचाराचे वक्ते,टी राजा सिंघ यांच्या नेतृत्वात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच सदर मोर्चाला सांगली पोलिस विभागाने अटी शर्ती देवून मोर्चाला परवानगी देखील देण्यात आली आहे.



मोर्चाचा मार्ग पुढील प्रमाणे असेल 


झुलेलाल चौक-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक-दीनानाथ चौक-
शिवस्मारक-मारुती चौक-बालाजी चौक कापड पेठ मार्गे-महानगरपालिका-स्टेशन रोड मार्गे काँग्रेस भवन-राम मंदिर चौकात सभेत रूपांतर होईल. सदर मोर्चात बहुसंख्यने समाजबांधव, महिला, विविध समाजाचे पदाधिकारी सभासद विविध हिंदुत्वादी संघटना व त्यांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत मोर्चा संपन्न होणार आहे. यावेळी सकल हिंदू समांजाच्या वतीने सांगली एसपी आणि स्थानिक पीआय यांनी मोर्चाला परवानगी दिल्याने त्यांचे आभार मानण्यात आले आणि सदर मोर्चात जास्तीत जास्त हिंदू समाजाणे सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment