Sunday, July 21, 2024
Homeक्रीडाIPL 2024कोहलीने रचला इतिहास, IPLमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

कोहलीने रचला इतिहास, IPLमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

मुंबई: ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला आहे. कोहली ८ हजा धावा करणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिला क्रिकेटर बनला आहे. त्याने बुधवारी हे यश मिळवले.

कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात २४ बॉलमध्ये ३३ धावांची खेळी करत हा रेकॉर्ड बनवला. आयपीएलमध्ये विराट कोहलीने ५५ अर्धशतके ठोकली आहे. या दरम्यान त्याने २७२ षटकार आणि ७०५ चौकार लगावले आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही १३१.९७ इतका आहे.

आयपीएल २०२४च्या हंगामातीलही कोहली टॉप स्कोरर आहे. त्याने १५ सामन्यात ६७.०९च्या सरासरीने ७३८ धावा केल्या आणि ऑरेंज कॅप आपल्याकडे ठेवली.

आयपीएलमध्ये आता कोहलीनंत दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन आहे. त्याने २२२ सामन्यांमध्ये ३५.२६च्या सरासरीने ६७६९ धावा केल्यात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -