
जळगावातील हादरवणारे कृत्य उघडकीस
जळगाव : जळगाव शहरातील कलिका माता मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका टोळीने हॉटेलमध्ये जेवणाऱ्या एका तरुणावर जोरदार हल्ला करत त्याची घृणास्पद हत्या केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे असे मृत तरुणाचे नाव असून तो जळगाव शहरातील एका भानू हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांसोबत जेवण करत होता. यावेळी हातात काठ्या घेऊन सात ते आठ तरुण हॉटेलमध्ये शिरले. काहीशा जुन्या वादातून त्यांनी किशोर सोनवणेवर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. मृत्यू होऊनही या टोळक्यांनी मारहाण सुरूच ठेवल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
दरम्यान, याप्रकरणी आरोपी विरोधात शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात यश आले आहे.