Thursday, June 12, 2025

Heat Wave: हाय बीपी आणि शुगरच्या रुग्णांनी उन्हाळ्यात घ्या खास काळजी

Heat Wave: हाय बीपी आणि शुगरच्या रुग्णांनी उन्हाळ्यात घ्या खास काळजी

मुंबई: यंदाच्या वर्षी एप्रिलच्या शेवटीपासून कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मेमध्ये तर लोकांचे हाल झाले आहेत. कडक उन्हामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत आहे. वाढत्या तापमानाचा शरीरावरही मोठा परिणाम होत आहे.


या मोसमात डायबिटीज आणि हाय बीपीच्या रुग्णांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या भयानक उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. केवळच इतकंच नव्हे तर ब्लड शुगर लेव्हलही वेगाने वाढू शकते. अशातच शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचा बॅलन्स राखणे गरजेचे आहे.


वेळेनुसार बीपी चेक करत राहा. तसेच शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही हे ही तपास राहा. शरीरात जास्त गरम वाटू नये म्हणून लिंबू पाणी पित राहा. बीपी आणि शुगर दोन्ही कंट्रोलमध्ये राहील. साखर आणि मीठाचे पाणी पित राहा.


हंगामी फळे खा. हे आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे शरीरात नॅच्युरल पद्धतीने पाण्याची भरपाई होते. शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.

Comments
Add Comment