Monday, May 19, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

Dinesh Karthik: नोकरी करणार कार्तिक! रिटायरमेंटनंतर कसे असेल भविष्य?

Dinesh Karthik: नोकरी करणार कार्तिक! रिटायरमेंटनंतर कसे असेल भविष्य?

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये बुधवारी एलमिनेटरचा सामना रंगला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून ४ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरूचे खेळाडू या निराशाजनक पराभवानंतर घरी परतणार त्याआधी सर्वांनी संघातील विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.


दिनेश कार्तिक आपल्या आयपीएलच्या करिअरमध्ये ६ संघांसाठी खेळला. यादरम्यान त्याने २५७ सामन्यांत खेळताना ४८४२ धावा केल्या आणि २२ अर्धशतकी खेळीही केल्या. एक विकेटकीपर असल्याने त्याने १४५ कॅच आणि ३७ स्टम्प आऊटही केलेत.



प्रशिक्षक बनणार दिनेश कार्तिक?


एलिमिनेटर सामन्यात बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर आरसीबीचे कोच अँडी फ्लावरने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये कार्तिकचे तोंडभरून कौतुक करताना म्हटले की कार्तिकने आयपीएल २०२४सुरू होण्याआधी खूप क्रिकेट खेळले नव्हते. यानंतरही तो संघासाठी चांगला खेळला.


यावेळी त्यांनी असेही संकेत दिले की तो भविष्यात प्रशिक्षक म्हणून काम करू शकतो. फ्लावर म्हणाले कार्तिकला कमेंट्री करायला आवडते आणि या प्रोफेशनमध्ये त्याला यशही मिळाले आहे. त्याला कोचिंगची आयडियाही आवडली आहे आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठी तो नेहमी तत्पर असतो.



कार्तिकने जिंकली आहे आयपीएल ट्रॉफी


दिनेश कार्तिक त्या खेळाडूंपैकी एक आहे जो आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगच्या सर्व हंगामात खेळला आहे. या दरम्यान त्याने ६ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र केवळ एकदा तो ट्रॉफी विनिंग संघाचा भाग होऊ शकला आहे. कार्तिक २०१२-१३मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. यावेळेस मुंबईने ट्रॉफी जिंकली होती.

Comments
Add Comment