
मुंबई: शाहरूख खानची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उन्हामुळे सुपरस्टारची तब्येत बिघडली आणि तो डिहायड्रेशनचा बळी झाला. यानंतर त्याला अहमदाबादच्या के केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शाहरूख खान आयपीएल २०२४च्या क्वालिफायर १मध्ये आपला संघ केकेआरला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादमध्ये होता. त्याला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आपल्या संघासाठी टाळ्या वाजवताना आणि त्यांना चीअर अप करताना दिसला होता.
हीटस्ट्रोकमुळे बिघडली तब्येत
अहमदाबादमध्ये तापमान ४० डिग्री पार होते. अशातच हीट स्ट्रोकमुळे शाहरूख खानची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
आयपीएल २०२४च्या क्वालिफायर १ मध्ये शाहरूख खानचा मुलगा अबराम आणि मुलगी सुहानासोबत आपल्या टीमला सपोर्ट करताना दिसला होता. सोशल मीडियावर सुपरस्टारचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता. यानंतर अबरामसोबत केकेआरच्या परफॉर्मन्सवर तो खुश होताना दिसला होता.