Tuesday, July 1, 2025

Health: या लोकांनी आंब्याचे सेवन करू नये

Health:  या लोकांनी आंब्याचे सेवन करू नये

मुंबई: आंबा हा फळांचा राजा असतो. फळांमध्ये आंब्याला विशेष स्थान आहे. मधुर, बहुगुणी असा हा आंबा आवडत नसेल असा माणूस निराळाच असेल. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे आंबा. फार कमी लोक असे असतील ज्यांना आंबा खायला आवडत नसेल.


आंबा हा स्वादासोबतच आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. मात्र काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. डायबिटीजच्या रुग्णांनी आंबा सांभाळून खाल्ला पाहिजे. या लोकांनी आंब्यासोबत नट्सचे सेवन केले पाहिजे. यामुळे त्यांच्या शरीरात ग्लायसेमिक बॅलन्स राहील.


डायबिटीजच्या रुग्णांनी हंगामाच्या सुरूवातीला आंबे खाऊ नयेत. अशा लोकांनी आंब्याची स्मूदी अथवा लस्सी बनवून ते पिऊ शकतात. आंब्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते त्यामुळे आंबा प्रमाणातच खावा.

Comments
Add Comment