Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Career Tips: १२वी पास केल्यानंतर कसे बनाल Nutrionist, मिळेल चांगला पगार

मुंबई: जर तुम्ही १२वी पास झाला आहात आणि करिअर बनवण्याचा विचार करत आहात तर Nutrionistचा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. Nutrionistचा पर्याय त्यांच्यासाठी चांगला आहे ज्यांना निरोगी जीवनशैली आणि पोषण यात आवड आहे.

Nutrionist बनण्यासाठी ग्रॅज्युएशन अथवा पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असणे आवश्यक आहे. प्रमुख अभ्यासक्रमात फूड अँड न्यूट्रिशिअन, ह्युमन न्यूट्रिशिअन, डायटेटिक्स अँड न्यूट्रिशिअन, फूड सायन्स अँड न्यूट्रिशिन, पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन असे कोर्स येतात.

ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम ३ वर्षांचा असतो. तर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्राम २ वर्षांचा असते. डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम १ वर्षांचा असतो.

अभ्यास केल्यानंतर उमेदवाराकडे अनेक करिअर पर्याय असतात. जसे क्लीनिकल न्यूट्रिशनिस्ट, खेळ पोषण विशेषज्ञ, सार्वजनिक स्वास्थ न्यूट्रिशनिस्ट असे पर्याय आहेत. या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स, टीम वर्क गरजेचे आहे.

एका न्यूट्रिशनिस्टचा महिन्याचा पगार साधारण ३० हजार ते ५० हजार रूपये प्रति महिना इतका असतो. अनुभवानुसार यात कमी अधिक वाढ असते.

Comments
Add Comment