Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीBuddha Purnima 2024 : बुद्धपौर्णिमेला 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; होणार मालामाल!

Buddha Purnima 2024 : बुद्धपौर्णिमेला ‘या’ राशींवर होणार पैशांचा पाऊस; होणार मालामाल!

जाणून घ्या कोणत्या आहेत नशीबवान राशी

मुंबई : भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा २३ मे म्हणजेच गुरुवारी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी ग्रहमान अत्यंत शुभ असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शनीची स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे काही राशींना येत्या काळात मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांना या दिवशी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारु शकते. त्यासोबतच या राशीतील लोकांचं उत्पन्न आणि मिळकतीतही वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. पूर्वी झालेल्या खर्चातील वाढ आता आटोक्यात येऊ शकते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली राहील. यासोबत व्यवसायात मोठी डील मिळू शकते किंवा तुमच्या काही योजना यशस्वी होऊ शकतात.

वृषभ रास (Taurus)

बुद्ध पौर्णिमेपासून वृषभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रमोशनचे योग आहेत, तुम्ही तुमच्या आवडीची पोस्ट मिळवू शकता. गुंतवणुकीतून विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना पैसे कमावण्याच्या भरपूर संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत तुमची प्रगती होईल. खासगी जीवनाशी संबंधित कामं पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.

तूळ रास (Libra)

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धन योग बनल्याने तूळ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला उच्च पद मिळू शकतं. घरात आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. मंगलकार्यातही सहभागी होता येईल.

कुंभ रास (Aquarius)

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांवर शनिची कृपा राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. गुंतवणूक केल्यास त्यात तुम्हाला नफा मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.

(टीप : वरील दिलेली सर्व माहिती ज्योतिषशास्त्रांकडून मिळाली असून ‘प्रहार’ अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -