Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीTips: तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स या पद्धतीने करा स्वच्छ, नेहमी दिसतील नव्या...

Tips: तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स या पद्धतीने करा स्वच्छ, नेहमी दिसतील नव्या सारखे

मुंबई: घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि मायक्रोव्हेव वेळेसोबतच खराब होतात. जर यांना योग्य पद्धतीने स्वच्छ केले नाही तर ते जुने दिसू लागतात. आम्ही येथे तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे हे गॅजेट्स साफ ठेवू शकता आणि नेहमी नव्यासारखे दिसतील.

मऊ कपड्याचा वापर करा

गॅजेट्स साफ करण्यासाठी मऊ आणि मायक्रोफायबर कपड्याचा वापर करा. या कपड्यामुळे स्क्रीनवर तसेच सरफेसवर ओरखडे पडत नाहीत. तसेच तुम्ही हा हलका ओलाही करू शकता. यामुळे धूळ आणि घाण स्वच्छ होईल. दरम्यान, कपडा खूप ओला करू नका. यामुळे गॅजेट्समध्ये पाणी जाणार नाही.

कपडा थोडासा ओला केल्याने धूळ आणि घाण साफ होण्यास मदत होते. तसेच यामुळे गॅजेट्स सुरक्षित राहतात

मऊ ब्रशचा करा वापर

कीबोर्ड, स्पीकर अथवा छोट्या भागांच्या सफाईसाठी सॉफ्ट ब्रशचा वापर करा. यामुळे धूळ तसेच घाण निघून जाण्यास मदत होते. छोटे छोटे कोपरे आणि जागांमध्येही सफाई होते. यामुळे तुमचे गॅजेट्स स्वच्छच होणार नाहीत तर नव्यासारखे चमकतील.

स्क्रीन क्लीनरचा करा वापर

स्क्रीन साफ करण्यासाठी खास स्क्रीन क्लीनरचा वापर कार. यामुळे स्क्रीन साफ आणि चमकदार होईल. साधे पाणी अथवा इतर कोणत्याही क्लीनरचा वापर करू नका यामुळे स्क्रीन खराब होऊ शकते.

व्हॅक्युम क्लीनरचा करा वापर

जिथे कपडा अथवा ब्रश पोहोचत नाही तेथे छोट्या व्हॅक्युम क्लीनरचा वापर करा. यामुळे धूळ व्यवस्थित साफ होईल. तसेच छोटे छोटे कोपरे आणि भेगांमध्ये सफाईसाठी व्हॅक्युम क्लीनर अतिशय फायदेशीर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -