
मुंबई: गेल्या शनिवारी पुणे शहरात भयानक अपघात घडला. या अपघातात एका लक्झरी पोर्शे कारने टूव्हीलरला टक्कर दिली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला अटक केली आहे. आरोपीच्या वडिलांना राज्याच्या संभाजीनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
हा अपघात कल्याणी नगरमध्ये झाला होता. अपघातानंतर आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. मात्र अवघ्या १५ तासांतच त्याला जामीन मिळाला. प्रकरण दाखल होताच वडील फरार झाले होते. विशाल अग्रवाल हिट अँड रन प्रकरणात कारने दोन जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीचे वडील आहेत. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
कसा झाला होता अपघात
कल्याणी नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर दोनही पीडित स्कूटीवरून घरी परतत होते. कल्याणी नगर जंक्शनला पोहोचले असताना एका वेगाने येणाऱ्या पोर्शे कारने त्यांना टक्कर दिली. यात स्कूटीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीच्या वडिलांवर हे आरोप
अपघातावेळेस पोर्शे कारचा वेग २०० किमी प्रति तास इतका होता. आरोपी ड्रायव्हरचे वडील विशाल ब्रम्हा रिअॅिलिटी नावाने कंपनी चालवतात. आरोपीने नुकतीच १२वीची परीक्षा दिली होती आणि पार्टी करून तो परतत होता. आरोपी वडिलांवर असा आरोप आहे की त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला पोर्शे कार चालवायला दिलीच कशी. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला कार चालवायला देणे हा गुन्हा आहे.