Sanjay Dutt : 'वेलकम ३'चा भाग नसणार संजय दत्त! केवळ एका दिवसाचं शूटिंग केलं आणि...

  73

संजयने का केलं बॅकआऊट?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'वेलकम टू जंगल' (Welcome to jungle) म्हणजेच वेलकम चित्रपटाच्या तिसर्‍या भागाची चर्चा आहे. अक्षय कुमार (Askhay Kumar), दिशा पटानी, रवीना टंडन, श्रेयस तळपदे असे अनेक तगडे कलाकार या निमित्ताने सिनेमात एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. त्यातच सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) असल्याचे कळल्याने चाहते खूश झाले होते. मात्र, संजयबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केवळ एक दिवस या सिनेमाचं शूटिंग केल्यानंतर त्याने या सिनेमातून बॅकआऊट केलं आहे. याचं कारणही आता समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे संजय दत्तने हा निर्णय घेतला आहे. संजय दत्तने मुंबईतील मड आयलंडमध्ये फक्त एक दिवस शूटिंग केलं आणि या चित्रपटाला रामराम ठोकला. 'वेलकम टू द जंगल' हा लोकप्रिय 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. संजयच्या व्यक्तिरेखेची चित्रपटात खूप ॲक्शन होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या प्रकृतीचा विचार करत चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.


२०२३ मध्ये या चित्रपटाची संपूर्ण कलाकारांसह घोषणा करण्यात आली. अक्षय सोबत या चित्रपटात दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, लारा दत्ता, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी आणि मिका सिंग यांचा समावेश आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई