मुंबई: जमिनीवर ज्या पद्धतीने लोक बसतात ते एक प्रकारचे आसन असते. यामुळे शरीरास अनेक फायदे होतात. असे केल्याने पोट तसेच पायांचे आरोग्य चांगले राहते. जमिनीवर बसून जेवल्याने पाचनशक्तीही सुधारते.
जमिनीवर बसणे हे खर्ची-अथवा सोफ्यावर बसण्यापेक्षा अधिक फायदेशीर असते. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आजही अनेक घरांमध्ये जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. असे केल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. यामुळे पाचनसंस्था सुधारते. बॉडीची फ्लेक्सिबिलिटी कायम राहते. तसेच अन्य फायदे होतात.
जमिनीवर पद्मासनात बसल्याने मेडिटेशनसाठी फायदेशीर ठरते. यामुळे तणाव कमी होतो. तसेच शरीरात ऑक्सिजन सप्लाय वाढतो.
जमिनीवर बसल्याने शरीराची लवचिकता वाढते. अनेक समस्यांपासून बचाव होतो. यामुळे आपण अॅक्टिव्ह राहतो.