
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रेयस अय्यरच्या ५८ आणि वेंकटेश अय्यरच्या ५१ धावांच्या जोरावर आयपीएल २०२४च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताने हैदराबादला ८ विकेट राखून हरवले.
आयपीएल २०२४च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने हे आव्हान १३.४ षटकांत आणि ८ विकेट राखत पूर्ण केले. यासोबतच केकेआरने फायनलमध्ये प्रवेश केा आहे.
कोलकातासाठी मिचेल स्टार्कने ३ विकेट मिळवल्या. तर फलंदाजीत वेंकटेश अय्यरने २८ बॉलमध्ये नाबाद ५१ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने २४ बॉलमध्ये नाबाद ५८ धावांची मॅचविनिंग खेळी केली. आता सनरायजर्स हैदराबाद २४ मेला दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.
यानंतर आता २२ मेला एलिमिनिटेर सामना खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. यांच्यातील विजेत्या संघाशी आता २४ मेला सनरायजर्स हैदराबादचा सामना होणार आहे.