
मुंबई: महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपत आहे. आज म्हणजेच २१ मे २०२४ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या गेलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता.
किती वाजता येणार निकाल?
महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होईल. याबाबत सोमवारी मंडळाने नोटीस जारी केली होती. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला डिटेल्स म्हणून तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. यानंतर तुम्ही निकाल चेक करू शकता. यावर्षी तब्बल १४ लाख परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली होती.
या वेबसाईटवरून चेक करू शकता निकाल
१२वीच्या परीक्षेचा निकाल तुम्ही अनेक वेबसाईटवरून पाहू शकता. याची लिस्ट बोर्डाने नोटीससोबत जाहीर केली आहे.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hsc.mahresults.org.in
results.digilocker.gov.in
results.targetpublications.org
hscresult.mkcl.org
results.gov.in.
या तारखेला झाल्या होत्या परीक्षा
महाराष्ट्र मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान पार पडल्या होत्या.याचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यानंतर दहावीचे निकाल जाहीर होतील.
निकाल आज जाहीर होणार आहे त्यानंतर उद्या म्हणजेच २२ मेला रिव्हॅल्यूएशनसाठी तुम्ही अर्ज करू शकता. विद्यार्थी २२ मे ते ५ जूनपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात.
गेल्या वर्षी मुलींची बाजी
२०२३मध्ये बारावीच्या निकालात मुलींनी ९३.७३ टक्क्यांसह बाजी मारली होती. मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली होती. मुलांचे पास होण्याचे एकूण प्रमाण ८९.१४ टक्के होते. गेल्या वर्षी पास झालेल्यांचे एकूण प्रमाण ९१.२५ टक्के होते.